सचिन मधुकर परांजपे (बाबा) पालघर

5.0K subscribers

About सचिन मधुकर परांजपे (बाबा) पालघर

आध्यात्मिक उपाय उपासना, ललितलेख, भाग्यरत्ने, रुद्राक्ष, पारद सिध्द वस्तू, वास्तुरिडिंग आणि मार्गदर्शन...9823124242

Similar Channels

Swipe to see more

Posts

सचिन मधुकर परांजपे (बाबा) पालघर
6/10/2025, 2:17:51 AM

*ज्या व्यक्तींचा तुम्ही, ज्या विशिष्ट गोष्टींसाठी #मत्सर करता ती विशिष्ट गोष्ट तुमच्यापासून दूर जायला सुरुवात होते. कारण, युनिवर्सकडे तुमच्या भावना त्या विशिष्ट गोष्टीसाठी नकारात्मकच आहेत अशीच नोंद होते.... म्हणजे एखाद्या व्यक्तीची श्रीमंती, आरोग्यसंपन्नता, व्यावसायिक यश, वाहन सौख्य, घर कशाबाबतही तुम्ही #मत्सर करायला सुरुवात केली की युनिवर्सचा समज असा असतो की तुम्हाला ती विशिष्ट गोष्टच अप्रिय आहे (प्रत्यक्षात तुम्ही ती व्यक्ती आणि ती गोष्ट या combination वर नाराज असता)...* म्हणजे एखाद्याची बक्कळ श्रीमंती बघितल्यापासून “साला याची औकात सायकलवर फिरायची पण नाही आणि हा बीएमडब्ल्यू मधून फिरतो” असं म्हणताक्षणी युनिवर्स ती व्यक्ती आणि बीएमडब्ल्यू या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी कठीण करते, अप्राप्य करते, दूर ठेवते.... हा अलिखित नियम आहे. एक काम करायचं.... *अमुक एक गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती विशिष्ट गोष्ट म्हणजे ऐश्वर्यसंपन्नता, मनःशांती, यशस्विता, आनंद, पैसा अडका ज्यांच्याकडे आहे त्या माणसांविषयी मनात मैत्र आणि सकारात्मक भावना आणा... भले कृत्रिमपणे का होईना पण त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या, चांगले विचारच करायचे.... आणि मग त्या गोष्टी तुमच्याकडे आपोआपच कशा आकृष्ट होतात ते फक्त बघा....* ✍🏻 *सचिन मधुकर परांजपे* *(पालघर)*

❤️ 🙏 👍 😮 😂 378
Link copied to clipboard!