मी ज्ञानी होणार
3.3K subscribers
Similar Channels
Swipe to see more
Posts
*राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्थेकडून मी ज्ञानी होणार राज्यस्तरीय परीक्षेसाठी परीक्षा केंद्रसंचालक , पर्यवेक्षक व सहभागी शाळेतील शिक्षक , विद्यार्थ्यांचे पालक व ज्यांच्यासाठी हे सर्व चालले आहे असे आपले विद्यार्थी व उद्याचे भावी अधिकारी यांना खूप खूप शुभेच्छा*🌹🌹🌹👍
*`पंढरीच्या विठुरायाने पाहिले 75 चिमुकले भावी प्रशासकीय अधिकारी....`* होय *अगदी बरोबर वाचलंत....* *भावी प्रशासकीय अधिकारी घडताहेत* आणि तेही *छोट्या छोट्या जिल्हा परिषदेच्या आणि काही निवडक खाजगी शाळांच्या मधून....* *नुकताच असर या संस्थेचा वार्षिक अहवाल* आला आणि त्यात *नेहमीप्रमाणे प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं;* परंतु *या सर्वांच्या पलीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी, त्यांच्यातून उत्तम जाण असलेले प्रशासकीय अधिकारी घडावेत* हे *ध्येय उराशी बाळगून राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोदला, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, ही सामाजिक संस्था काम करते आहे* हे *अशा संस्थांच्या गावीही नसावं...* *निमित्त होतं मी ज्ञानी होणार सामान्य स्पर्धा परीक्षेची राज्यस्तरीय परीक्षा...* *संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी राजर्षी शाहू महाराज जयंती पासून* ते *राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत प्रतिदिन सामान्य ज्ञानावरील पाच प्रश्न मुलांना पाठवले* जातात आणि *त्यावर प्रत्येक महिन्याला छोटी* तर *राजमाता जिजाऊ जयंती दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी एक अंतिम परीक्षा* घेतली जाते. यातील *निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने बक्षिसे तर मिळतातच; पण अशा सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षा* देखील घेतली जाते. यंदा *सोलापूर जिल्ह्यातील शाळांची ही परीक्षा दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी आपटे उपलप प्रशाला पंढरपूर येथे* पार पडली. सोलापूर *जिल्ह्यातील जवळपास 20 हून अधिक शाळांमध्ये 75 विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी* झाले होते. *स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे अभिरुची वृद्धिंगत करणारी आणि मुलांना आवडीने सहभागी व्हायला भाग पाडणारी अशी परीक्षा निरंतर चालत राहो* अशी भावना यावेळी *आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आपटे उपलप प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव कांबळे सर यांनी व्यक्त केली.* तर *यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 असलेली संख्या भविष्यात 750 पर्यंत पोहोचावी असे साकडे पंढरीच्या विठुरायाकडे घातल्याचे संस्थेचे सदस्य नाना मुळीक* यांनी सांगितले. संपूर्ण *परीक्षेचे सनियंत्रण करणारे पर्यवेक्षक सौ अरुंधती सलगर, श्री सचिन पंडित, श्री नेताजी रणदिवे आणि सहकार्य करणारे सर्व शिक्षक आणि पालक यांचे आयोजकांच्या वतीने आभार* मानण्यात आले.