ॲड. सचिन देशमुख WhatsApp Channel

ॲड. सचिन देशमुख

27 subscribers

About ॲड. सचिन देशमुख

*ॲड. सचिन लक्ष्मण देशमुख - एक नाव, एक विश्वास* मा. जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य, सोलापूर *कोळ्याच्या पावन भूमीवर जन्मलेला, सांगोल्याचा भूमिपुत्र, सचिन देशमुख!!* • ॲड.सचिन देशमुख यांचा जन्म कोळ्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीपासून समाजसेवेची ओढ असल्यामुळे त्यांनी अनेक उपक्रमांत हिरीरीने सहभाग घेतला. • राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरच्या भुमिमध्ये तरुणपणात विद्यार्थीहिताचे अनेक प्रश्न सोडविले आणि प्रसंगी आंदोलने देखील केली. सोबतच कायद्याचे शिक्षण घेऊन सांगोल्यातील न्यायालयात वकिली सुरू केली. • वकीलीच्या माध्यमातून अनेक गरजू, पीडित, उपेक्षितांचे प्रश्न सोडविले. वकिली सुरू असतानाच स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि राजकीय कार्य सुरू केले. • सचिन देशमुख यांच्या समाजहितासाठी काम करण्याची इच्छा आणि आबासाहेबांप्रति असणारी निष्ठा बघून स्वतः आबासाहेबांनीच सचिन देशमुख यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची जडणघडण केली. • ह्याच काळात सचिन देशमुख यांना भाई गणपतराव देशमुख यांच्यासह स्व. जगन्नाथ तात्या लिगाडे, स्व. वसंतराव पाटील, स्व. बाबासाहेब देशमुख, स्व. शामराव आप्पा पाटील, स्व. रामभाऊ काका वाघमोडे, स्व. बाबा करांडे, स्व. शेशाप्पा मिसाळ, स्व. जयराम पाटील अश्या राजकीय दिग्गजांचे सानिध्य लाभले आणि त्यामुळे समाजाचे प्रश्न, जनसामान्यांच्या समस्या, सांगोल्याच्या विकासाची परिभाषा या सर्व गोष्टी समजून घेण्याची एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. • असा सापेक्ष आणि समाजातील सर्व घटकांची जाण, सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेला व सर्वसामान्य घरात जन्मलेला हा भूमिपुत्र सांगोल्याला प्रगतीपथावर नेऊ पाहत आहे. आपण सर्वांनी या भूमीपुत्राला आशीर्वाद देऊन भरघोस पाठिंबा द्यावा... ही विनंती..!! ऑफिस संपर्क : ८७६७२०९०८७

Similar Channels

Swipe to see more

Posts

No posts available for this channel.
Link copied to clipboard!