
शेतकरी ई प्लॅटफॉर्म
1.6K subscribers
About शेतकरी ई प्लॅटफॉर्म
||कृषि मुलम् जगत सर्वमं|| कृषि क्षेत्रातील महत्वाच्या न्युज, शेती व्यवसाातील उद्योगाची माहिती शेतकरी कंपनी आणि शेतकरी गटा विषयी आणि शासकीय योजनेची महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवापर्यंत पोहचवणे हाच प्रामाणिक उद्देश. ई नाम (National Agriculture Market). मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट)प्रकल्प. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प. राष्ट्रीय पशुधन अभियान NML Scheme मग्नेट प्रकल्प. १०,००० शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना प्रकल्प. Agriculture Technical Management Agency- ATMA प्रकल्प. नाबार्ड प्रकल्प. नाफेड शासकीय हमीभाव खरेदी केंद्र. ड्रोन FPC योजना,ड्रोन दीदी योजना. *अधिक माहितीसाठी संपर्क* Email:- [email protected] Mobile:+91 7276870018
Similar Channels
Swipe to see more
Posts

🌱 *"बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच?"*👨🌾 "खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्याची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो. 👉 अनेकदा शेतकरी बांधव दरवर्षी बाजारातून नवे बियाणे खरेदी करतात. परंतु, हे बियाणे महाग असतानाही त्याची उगवणक्षमता कितपत योग्य आहे, हे निश्चित नसते." 👉 "अशा वेळी वेळ, श्रम आणि पैसा वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळेच उगवणक्षम बियाणे वापरणे हा खरीप यशस्वी करण्याचा मूलमंत्र ठरतो. 🎯 गोणपाट वापरून बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी? 👉 बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातुन खोलवर हात घालुन मुठभर धान्य बाहेर काढा, सर्व पोत्यातुन काढलेले धान्य एकत्र करून घ्या. 👉 गोणपाटाचे सहा चौकनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवून घ्या. एक तुकडा जमीनीवर पसरवा. 👉 पोत्यातुन काढलेल्या धान्यातुन सरसकट १०० दाणे मोजून दीड-दोन से.मी. अंतरावर (बोटाचं एक कांड अंतरावर) १०-१० च्या रांगेत गोणपाटाच्या एक तुड्यावर ओळीत ठेवावे अशा प्रकारे १०० दाण्याचे ३ नमुने तयार करावे. 👉गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारावे. 👉गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवा. 👉६-७ दिवसानंतर ही गुंडाळी जमीनीवर पसरून उघडा चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा तिनही गुंडाळ्याची सरासरी काढुन १०० दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा आणि शिफारशी प्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरा. 👉जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा. 👉पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करण्यास विसरू नका."


🎯 *वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्र येथे 18 मे 2025 पासून विक्रीस उपलब्ध असलेले बियाणे व त्याचे दरपत्रक*
