BMC EMPLOYEES| MCGM GURU (Govt.Mcgm)
                                
                            
                            
                    
                                
                                
                                January 21, 2025 at 01:43 AM
                               
                            
                        
                            शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या "नाशिक" आणि "रायगड" या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत, याद्वारे, स्थगिती देण्यात येत आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११९२०५३२५५७०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
शनिवारी जाहीर करण्यात आलेली संपूर्ण यादी 
1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
2. ठाणे - एकनाथ शिंदे 
3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे 
4. पुणे - अजित पवार 
5. बीड - अजित पवार 
6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे 
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम - हसन मुश्रीफ
10. सांगली - चंद्रकांत पाटील
11. नाशिक - गिरीश महाजन (स्थगिती देण्यात आली)
12. पालघर - गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ - संजय राठोड
15. मुंबई उपनगर - आशिष शेलार तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा 
16. रत्नागिरी - उदय सामंत 
17. धुळे - जयकुमार रावल
18. जालना - पंकजा मुंडे
19. नांदेड - अतुल सावे
20. चंद्रपूर - अशोक उईके 
21.सातारा - शंभूराज देसाई
22. रायगड - आदिती तटकरे (स्थगिती देण्यात आली)
23.लातूर - शिवेंद्रराजे भोसले 
24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25.सोलापूर - जयकुमार गोरे
26. हिंगोली - नरहरी झिरवाळ
27. भंडारा - संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
29. धाराशिव - प्रताप सरनाईक
30. बुलढाणा - मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग - नितेश राणे 
32. अकोला - आकाश फुंडकर 
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील 
34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ
35. वर्धा - पंकज भोयर 
36.परभणी - मेघना बोर्डिकर
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                    
                                        4