
छत्रपती शिवाजी महाराज
February 15, 2025 at 01:58 AM
*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 📜*
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ फेब्रुवारी १६३८*
वैभवशाली हिंदुंचे बागलाण राज्य संपुष्टात आले. अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुलै १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला आणि मुल्हेर किल्ला जिंकला व त्याचे नाव औरंगगड असे ठेवले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी वैभवशाली हिंदुंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलाणची परंपरागत राजधानी, किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपुर्या पगारासाठी बंड केले. दुसर्या सुरत लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ फेब्रुवारी १६६७*
"प्रतिशिवाजी" अशी ओळख असलेले "सरसेनापती नेताजी पालकर" यांचं औरंजेबने जबरदस्तीने धर्मांतर केले आणि त्यांचे "महंमद कुली खान" असे नामांतरण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ फेब्रुवारी १६८४*
छत्रपती संभाजीराजेंवर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो वैतागून परत निघून गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ फेब्रुवारी १६८९*
१ फेब्रुवारी १६८९ रोजी "छत्रपती संभाजीराजे" व "कवी कलश" हे मुघल सरदार "मुकर्रबखान" याच्या कैदेत सापडले होते आज त्यांना औरंगजेब बादशहापुढे हजर करण्यात आले आणि इथूनच संभाजीराजेंवर अमानुष अत्त्याचार करण्यास सुरूवात झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ फेब्रुवारी १७३८*
धारावी मराठ्यांच्या हाती आल्यानंतर तातडीने मेढा व इमारती बांधकाम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पोर्तुगीजांनीही दोन वेळा धारावी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकूण रागरंग पहाता पेशव्यांनी धारावीचा बंदोबस्त रामजी महादेव बिवलकर यांजकडे सोपविला. त्यांच्या मदतीस खंडोजी माणकर यांचेकडील अडीच हजार माणूस ठेवीला. रामजी महादेव यांनी पोर्तुगीजांचा व्यवस्थित बंदोबस्त केला व कोटाचे काम सुरू ठेवीले.
दिनांक १५ फेब्रुवारी सन १७३८ रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ*
*जय शिवराय, जय शंभूराजे*
*जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩*
🙏
🧡
4