Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
January 25, 2025 at 04:11 PM
जगप्रसिद्ध पक्षीतज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि प्रतिभावान लेखक श्री. मारुती चित्तमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावणारे श्री.चैत्राम पवार आणि नागपुरातील ख्यातनाम होमिओपॅथी चिकिस्तक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल या तीनही मान्यवरांचे मनापासून अभिनंदन करतो. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची आज घोषणा केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील या तीनही व्यक्तिमत्वांच्या कार्याचा यथोचित सन्मान त्यांना पद्म पुरस्कार जाहीर करुन करण्यात आला. पक्षी, प्राणी आणि विविध वनस्पतींसह निसर्गाबद्दलची दुर्मिळ माहिती, अनमोल ठेवा हा समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम मारुती चित्तमपल्ली सर आजवर करत आले आहेत. अशा या महान व्यक्तिमत्वाला पद्मश्री जाहीर होणं ही महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नागपुरातील होमिओपॅथी क्षेत्रात मोठं नाव असणाऱ्या डॉ. विलास डांगरे यांना आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या श्री. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो आणि या तीनही मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील पुढील कामगिरीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो!
👍 🙏 4

Comments