Sunil Tatkare
February 1, 2025 at 09:48 AM
केंद्रीय अर्थसंकल्पातून ऐतिहासिक घोषणा!
देशाला एक विकसित राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान मा.मोदीजींच्या नेतृत्वात, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवा आणि इतर सर्व वर्गांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण आणि इतर विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देत, मध्यमवर्गासाठी १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना करमुक्ती प्रदान करण्यासह, त्यावरील उत्पन्न धारकांसाठी आयकर स्लॅबमध्ये मोठी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील मध्यमवर्गीय, कामगार, कष्टकरी, शेतकरी, युवा, महिला आणि इतर सर्व वर्गांचे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी मोठे योगदान होईल, यात शंका नाही.
https://x.com/SunilTatkare/status/1885623712466227297
👍
2