Sunil Tatkare

6.0K subscribers

Verified Channel
Sunil Tatkare
February 2, 2025 at 01:09 PM
महिला क्रिकेट संघाची अभिमानास्पद कामगिरी, भारत पुन्हा एकदा विश्वविजेता! क्वालालंपूर येथे पार पडलेल्या महिलांच्या अंडर-१९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ९ विकेट्सनी धूळ चारत भारताच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावरती भारताचे नाव कोरले असल्याने माझ्यासह संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. हा ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल मी महिला संघातील सर्व खेळाडू आणि सहकारी टीमचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देतो.
❤️ 👍 💐 8

Comments