Sunil Tatkare
February 8, 2025 at 12:30 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यात आयोजित सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहिलो. यावेळी राज्यभरातील सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ‘सर्वधर्म समभाव’ या पक्षाच्या ध्येयधोरणाने सर्वसमाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आणि संधी मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहून जनकल्याणासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्यरत राहू आणि पक्ष अधिक मजबूत करू, असे आवाहन केले.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे, आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रवक्ते महेश शिंदे, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्षनाथ लोखंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
👍
❤️
4