👨‍✈️ Vision Khaki 🚔
January 31, 2025 at 02:13 PM
🍀वेळ निघून गेल्यावर हातात काहीच उरत नसतं... करू,बघू,होईल,जाईल या शब्दांनी कुठवर दिवस काढायचेत.... बऱ्यापैकी निकाल स्पष्ट झालाय, आता काय केल पाहिजेत तुम्हाला माहिती आहे... जी चूक झाली ती मान्य करायची त्यापासून पळ काढण्यात काही अर्थ नाहीय. स्वप्न पूर्ण झाल्यावर जेवढं देतात ना त्या पेक्षा जास्त पूर्ण नाही झाली तर काढून घेतात.... मनातून आवाज आला असेल अजून तयारी करायची मग सर्व अपेक्षा स्वतःकडून ठेव म्हणजे परत पश्चातापाची येणार नाही ... इच्छा असो अगर नसो ग्राउंडची तयारी आणि अभ्यास करावाच लागणार आहे. निराश होऊन चालणार नाही, अजूनही अपेक्षा आहेत आई-वडिलांना तुझ्याकडून..येईल तुझी सुद्धा वेळ.. ग्राउंड वर कपडे मळेपर्यंत तयारी करायची.. एक दिवस अंगावर वर्दी चमकली पाहिजे...
❤️ 👍 😢 😂 🙏 28

Comments