Meghna Bordikar
January 28, 2025 at 12:43 PM
📍जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, ऊर्जा, महिला व बालविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम या सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठीक उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत आगामी काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या, प्रत्येक शेतकऱ्यासाठी वीज उपलब्ध व्हावी, वाड्या वस्त्यांवर सुद्धा मुबलक पाणी व वीज या मूलभूत सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी काम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
या बैठकीसाठी खासदार अजितजी गोपछडे,नांदेडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी .,उपजिल्हाधिकारी,जिल्हा शैल्यचिकीत्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी,महिलाबालविकास अधिकारी व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
#meghnabordikar #bordikar #bjp #parbhani #nanded
👍
❤️
🙏
41