Meghna Bordikar
February 5, 2025 at 04:21 PM
आज एचएसबीसी फोर्ट, मुंबई येथे उर्जा विभागाची (महाजनको )आढावा संपन्न झाली.
राज्यात आगामी काळात नवीन ऊर्जा स्रोतांचा विकास, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि वीज निर्मिती मध्ये सुधारणांवर विशेष भर देण्यात यावे अशा सूचना दिल्या.
त्याचबोरबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. राज्यात सौर आणि पवन ऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढवून प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मितीला गती देण्यात यावे. शेती, उद्योग, व्यापार वापरासाठी वीज आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळेल यावर विशेष भर देण्यात यावा,अशा सूचनाही दिल्या.
राज्यातील विविध उर्जा प्रकल्प, निर्मितीच्या व्यवस्था आणि वीज मागणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
तसेच राज्यातील ऊर्जा निर्मिती, साठवणूक आणि वितरण यंत्रणांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्यात वीज निर्मिती केंद्रे, नवीन प्रकल्प, सौर व पवन उर्जा विकास योजना आणि औद्योगिक वसाहतींसाठी वीज पुरवठ्याच्या गरजा याविषयी चर्चा करण्यात आली.
उर्जा विभागातील अधिकाऱ्यांनी राज्यातील वीज उत्पादन क्षमता, मागणी-पुरवठा तफावत, भार नियमन धोरणे आणि नवीन प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. तसेच अपूर्ण वीज प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही चर्चा झाली. महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांनी सध्याच्या प्रकल्पांची स्थिती आणि येणाऱ्या अडचणी यासंदर्भात माहिती दिली.
या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी , संचालक संजय मारुडकर, अभय हरणे, बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक राजेंश पाटील, पंकज नागदेवते, नितीन चांदुरकर आदींची उपस्थिती होती. महाजनको विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#mseb BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bharatiya Janata Party (BJP)
👍
🙏
❤️
14