Meghna Bordikar

14.3K subscribers

Verified Channel
Meghna Bordikar
February 6, 2025 at 04:28 PM
एच एस बी सी बँक एम एस ई बी होल्डिंग कंपनी कार्यालय, फोर्ट ,मुंबई येथे आयोजित महापारेषण कंपनीच्या आढावा बैठक संपन्न झाली. महापारेषणमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसान टाळा व रखडलेले प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महापारेषणचे होणारे नुकसान कमी होईल यासाठी प्रयत्न करावे ,अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या . राज्यातील ऊर्जा क्षेत्र स्वयंपूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेवर विशेष भर देण्यात यावा. महापारेषणच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी, तक्रारींचे निराकरण वेळेत करण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देशही दिले. या बैठकीत महापारेषणच्या विविध प्रकल्पांची प्रगती, सौर ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी, तसेच कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. व रखडलेले सर्व प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले यावेळी महापारेषण चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार संचालक, सतीश चव्हाण, अविनाश निंबाळकर ,सुगद गमरे, तृप्ती मुधोळकर यांच्यासह महापारेषण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Wagh Amit Shah J.P.Nadda #meghnabordikar #bordikar #maharashtra #mumbai
👍 ❤️ 🙏 38

Comments