Meghna Bordikar

14.3K subscribers

Verified Channel
Meghna Bordikar
February 10, 2025 at 03:37 PM
मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होणार! आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची पाहणी केली. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्पाचे फायदे आणि वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यात आली. या प्रकल्पात ८.९२ किमी लांबीचे दोन बोगदे आणि १०० मीटर व ६५० मीटर लांबीचे दोन समांतर पूल बांधण्यात येणार आहेत. यामुळे सध्याच्या मार्गाच्या तुलनेत ६ किमी अंतर कमी होणार असून प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी घटणार आहे. याशिवाय इंधन बचत, वाहतूक सुरळीत होणे आणि पर्यावरणपूरक विकासालाही चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वात व उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ऑक्टोबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासात एक मोठे पाऊल ठरणार आहे! #development #mumbaipuneexpressway #maharashtra #progress #devendrafadnavis #eknathshinde BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
👍 ❤️ 🙏 16

Comments