Gadchiroli_ig
January 28, 2025 at 02:21 PM
गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थानिक सुट्टया जाहीर
गडचिरोली,(जिमाका),दि.28: सन 2025 या वर्षातील स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी जाहीर केल्या आहेत. यात शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी पोळा (पहिला दिवस), सोमवार, दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना, सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी) या सुट्ट्यांचा समावेश आहे.
उपरोक्त आदेश गडचिरोली जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, अधिकोष (बॅंक) यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.
❤️
👍
7