Gadchiroli_ig
January 30, 2025 at 02:30 PM
उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना
* 1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन
* विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, 113 बटा. सिआरपीएफचे कमांडण्ट श्री. जसवीर सिंग, 09 बटा. चे कमांडण्ट श्री. शंभु कुमार, 37 बटा. चे कमांडण्ट श्री. दाओ इंजीरकान कींडो व ग्रामस्थंाच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन
* मागील वर्षी 14 जून रोजी नेलगुंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली होती. नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल… पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल
👍
❤️
🙏
🔥
😮
29