卐 "साई-कृपा" 卐 ज्योतिष कार्यालय, टिटवाळा-कल्याण
January 31, 2025 at 05:10 PM
🌹 *ॐसाईनाथाय नम:*🌹 ♦️ *विचारपुष्प*♦️ *🌹स्मितहास्य🌹* एका हॉटेलमधील वेटरने एका ग्राहकाला सकाळच्या वेळी स्मितहास्यासह चहा दिला. त्या वेटरच्या स्मितहास्याने कमाल केली. त्या ग्राहकाचं आयुष्य अगदी एकसुरी होतं... पण... त्या चहाच्या एका कपाने जणू त्याच्या जीवनात नव्या शाखा फुटल्या! तो आनंदित झाला आणि त्याने ५० रुपये टिप स्वरूपात दिले. वेटरला कधी कल्पनाही नव्हती की, एका स्मितहास्यासाठी त्याला अशी बक्षिस मिळेल. तोही आनंदित झाला आणि त्याने २० रुपये एका भिकाऱ्याच्या हातात दिले. सकाळीच २० रुपये मिळतील असं त्या भिकाऱ्यालाही वाटलं नव्हतं... तो आनंदित झाला आणि काल उपाशी झोपलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी धावत निघाला... रस्त्यात वर्दळ असलेल्या रस्त्यावर तो एका लहान गाढवाला धावत उचलतो आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. हे दृश्य एका महागड्या गाडीत बसलेल्या अतिश्रीमंताने पाहिलं आणि त्याच्या मनात आलं की, ज्या गाढवाशी आपला काहीच संबंध नाही, त्यावरही प्रेम करणारा हा भिकारी खरा श्रीमंत आहे... आणि मी, जो माझ्या कंपनीतील मजुरांना, गाडीच्या ड्रायव्हरला किंवा माझ्या कुटुंबीयांना दुर्लक्षित करतो, खरा श्रीमंत कसा असू शकतो? त्या श्रीमंताने आनंदाने ड्रायव्हरला आणि कंपनीतील मजुरांना १०००-१००० रुपये बक्षीस दिलं. शेठकडून मिळालेल्या १००० रुपयांनी ड्रायव्हर खूप आनंदित झाला आणि तो कुटुंबासोबत समुद्र किनारी फिरायला गेला. तो आज खूप आनंदी होता. तो गाडीतून उतरला आणि त्याचवेळी एक तरुण उभा होता... दोघांच्या नजरा क्षणभरासाठी मिळाल्या आणि तो तरुण समुद्राला पाठ करून परत चालू लागला... ड्रायव्हरने विचारलं, "तुम्ही कोण? आणि अचानक मागे का फिरलात?" त्या अज्ञात तरुणाने उत्तर दिलं, "भाऊ, मी जीवनाला कंटाळलेला माणूस आहे, आत्महत्या करायला आलो होतो. *पण..." "मी एक संकल्प केला होता की, जर एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं तर आत्महत्या करणार नाही." "तुमच्या आनंदाने माझं आयुष्य वाचवलं आहे...! "थँक यू...!" याप्रकारे, आपल्या चेहऱ्यावरचं एक हसू कित्येकांच्या जीवनात अमर्याद आनंद निर्माण करू शकतं, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता आपण कुठे आहोत? ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, अशा भविष्याच्या चुकीच्या कल्पनांमध्ये आपण आपल्या जीवनातील आनंद हरवून बसतो... म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिका. जगणं रोज शिकवतं की, "जिवंत राहायला शिक, सांधत राहशील तरी तुटणं थांबणार नाही, पण शिवायला शिक!" म्हणून, "मन भरून जगा, मनात भरून नाही." *♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️* 📜 *दैनिक पंचाग व आध्यात्मिक माहितीसाठी ग्रुप* https://chat.whatsapp.com/DO2gfVBZ8qkHUjhxemyg3t ●┈┉❀꧁꧂❀┉┈● Follow this link to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919833271518 https://g.co/kgs/MkREmYM ●┈┉❀꧁꧂❀┉┈●
👍 😀 🙏 10

Comments