श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट
February 11, 2025 at 03:42 PM
सोमवार दि १०.०२.२०२५ रोजी प. पू. श्री शरदचंद्र प्रतापे महाराज - श्री क्षेत्र भालोद व नर्मदालयाच्या शिक्षणव्रती - भारतीताई ठाकूर यांनी आज मठाला भेट दिली. नर्मदा परिक्रमा ही फक्त परिक्रमाच नसून ती आयुष्यातील खूप मोठी साधना व तपस्या आहे. श्री शंकर महाराज वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात. जाँनसाहेब, सुपड्याबाबा, कुंवरस्वामी, गौरीशंकर अशा नावांनीही ते ओळखले जात. होशंगाबाद जिल्ह्यात नर्मदा किनारी खोकसर येथे श्री गौरीशंकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेता येते. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी. नर्मदा ही जीवनदायीनी आहे. अनेक लोकांचे जीवन तिने सुफलित केले आहे. परिक्रमेत प्रत्येकालाच तिची अनुभूती वेगवेगळ्या रूपात येते. ती मोक्षदायिनी आहे, असे प्रतिपादन गुजरात मधील भालोद येथील जेष्ठ नर्मदा परिक्रमावासी, दत्त उपासक शरदचंद्र प्रतापे महाराज यांनी केले. यावेळी उपस्थित भक्तांसह श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधी चे दर्शन घेऊन पाद्यपूजा करण्यात आली. प्रतापे महाराज व भारती ताई यांचा ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. विश्वस्त मंडळ डॉ. श्री मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), श्री सतीश कोकाटे (सचिव), डॉ. पी. डी. पाटील, श्री सुरेंद्र वाईकर, श्री राजाभाऊ सुर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले.. https://www.facebook.com/share/p/1Btmo2XY6b/
🙏 ❤️ 17

Comments