🚩 मराठा हृदयसम्राट 🚩
January 25, 2025 at 06:36 PM
*....प्रजेला पाणी आणि शौचालय नसलेले 'सरकारी' प्रजासत्ताक ?*
जे सरकार आणि सरकारची कार्यालय सर्वसामान्य प्रजेला घोटभर शुद्ध पाणी आणि माय - बहिणींना स्वच्छ शौचालय देऊ शकत नाही तेच सरकार आणि सरकारी कार्यालय उद्या लाखोंचा खर्च करीत 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या थाटामाटात साजरा करतील आणि मोठ्या रुबाबात सुटा बुटातले फोटो काढतील ! पण खरंच हे प्रजेचं प्रजासत्ताक आहे का ? प्रजेला प्रत्येक सरकारी कार्यालयात निदान घोटभर शुद्ध पाणी आणि स्वच्छ शौचालय तरी मिळेल का ?
शौचालय आणि पाण्यासाठी जर सरकारी कार्यालय धडधडीत खोटी आश्वासन देत असतील तर या व्यवस्थेचं, सरकारचं आणि सरकारी कार्यालयांच करायचं काय ?
शौचालय नसल्याने आपल्या माय-बहिणींची अब्रू चव्हाट्यावर आली तरीही अजून आपण गप्प कसे ? सकाळच्या दात घासण्याच्या पेस्ट पासून ते संध्याकाळच्या शाल पांघरण्यासाठी विकत घेतल्या जाणाऱ्या वस्तूंवरच्या जीएसटी (GST) चा पैसा जातो कुठे ?
प्रश्न घोटभर पाण्याचा नाही तर सर्वसामान्यांच्या होत असलेल्या थट्टेचा आहे ! यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे!
मी लढतोय, तुम्हीही लढा !
ॲड.श्रीरंग लाळे,
- मोहोळ (जि. सोलापूर).
#चलो_आंतरवली_एकच_वारी_25जानेवारी
#सार्वजनिक_आमरण_उपोषण
#public_hunger_strike
🚩 *मराठा हृदयसम्राट* 🚩 *Follow* 👇
https://whatsapp.com/channel/0029VaKJ1V97oQhjwjEUK03s TV
👍
❤️
12