🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
January 21, 2025 at 05:56 AM
माननिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सप्रेम जय शिवराय.... मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्याचे पालकत्व स्वीकारले आहे.. आपल्या राज्यात प्रत्येक समाज घटकांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे ही माफक अपेक्षा...आपण संवैधानीक पदावर असल्याने आपल्याला कोणत्याही समाजाबद्दल प्रेम किंवा कोणत्याही समाजाबद्दल आकस नसावा ही अपेक्षा.. मागिल 15-16 महिन्यापासुन मराठा समाज हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय...समाजाची फरफट चालू आहे त्यात भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती पहाता काही विभागात आरक्षणाची नितांत गरज आहे.माननिय मुख्यमंत्री महोदयांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा... आपण समाजाला वेठीस न धरता सरसकट आरक्षण लागू करावे.समाजातील वाढत चाललेला असंतोष आपल्याला परवडणारा नाही... समाज आज जरी वर वर शांत वाटत असेल तरी आतुन फार नाराज आहे...वाढत चाललेला भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि समाजा समाजातील तेढ हे एक मोठे संकट आहे...याचा उद्रेक होऊ शकतो..गावा गावात तंटे होतील आपण या बाबतीत तात्काळ काहीतरी मार्ग काढला पाहिजे. मनोज जरांगे पाटील हे परत आंदोलन करणार आहेत... सामुहिक उपोषणाला बसणार आहेत.. किती उपोषणं करायची... अंगात आता पहिल्या सारखी ताकद राहीलेली नाही... तुमच्या साठी तो माणुस एक व्यक्ती असेल पण आमच्या साठी तो माणुस सकल मराठा समाजाचा जिव कि प्राण आहे... आमच्या डोळ्यासमोर त्यांना वेदना होत असल्यास ते पहावत नाही... त्यांना उपोषणापासुन परावृत्त करण्यासाठी तुम्ही थोडासा पुढाकार घ्यावा.... सगेसोयरे चा कायदा पारित करून घ्यावा.. आणि न्याय करावा..
👍 ❤️ 13

Comments