🚩 मराठा हृदयसम्राट 🚩
February 18, 2025 at 03:17 AM
प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचे व चुकीची प्रक्रिया राबवत बेकायदेशीरपणे अनगर ( ता.मोहोळ, जि.सोलापूर) येथे नवीन अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा शासन निर्णय आणि सुरू केलेले कार्यालय हे मोहोळ विधीज्ञ मंडळ यांच्या व इतर याचिकाकर्ते यांच्या मा. मुंबई उच्च न्यायालयातील आदेशाने रद्द केले. मोहोळ बार असोसिएशन तसेच डॉक्टर्स, केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशन तसेच सामाजिक व व्यापारी संघटना तसेच मोहोळ तालुक्यातील अनेक ज्ञात-अज्ञात नागरिक यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील होते. यामध्ये प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधवांनीही महत्त्वाची भूमिका बजावली . हा संघर्ष कोणत्याही राजकीय भूमिका व व्यक्ती यांच्या विरोधातला नसून सर्वसामान्य लोकांची गैरसोय, गोरगरीब भाजी विक्रेते यांच्या पोटापाण्यासाठी आणि कायद्याच्या प्रतिष्ठेसाठी होता आणि (गाफील न राहता) तो इथून पुढेही सुरू राहील ! यामध्ये मोहोळ बार असोसिएशन मधील सन्मा. वकील मंडळींची एकजूट व न्यायालयीन लढा हा विशेष कारणीभूत ठरला. - ॲड. श्रीरंग लाळे , मोहोळ ( जि.सोलापूर ) सत्यमेव जयते ! https://youtu.be/woG2t2eDl0o?si=a1FZbvBJ1zFc7tZf
👍 🚩 4

Comments