🔱 THE HINDU 🚩
🔱 THE HINDU 🚩
February 21, 2025 at 01:34 AM
*धर्मवीर बलीदान मास* *सुरुवात:- २८ फेब्रुवारी ते २९ मार्च* *( फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या)* *धर्मवीर बलीदान मास म्हणजे काय? आणि तो का पाळायचा ?* औरंग्याने शंभुराजेंना पकडलेल्या गेलेल्या क्षणापासून दररोज एक एक अवयव तोडत ४० दिवस वेदना देऊन अत्यंत निष्ठुरपणे हत्या केली.. तो संपूर्ण महिना आपण कुठल्याही एका सुखाचा त्याग करायचा असतो व सुतकाचा महिना पाळायचा असतो . म्हणजेच महाराजांचा *धर्मवीर बलिदान मास* *धर्मवीर बलीदान मास कसा पाळायचा* १) धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसात अन्न पाण्याचा त्याग केला होता . हे लक्षात घेऊन . प्रत्येक जण संपूर्ण मास संपेपर्यंत एक वेळचं जेवण करणे टाळावे. २) मिष्ठान्न न खाण्याचा निश्चय करावा. ३)चहा पिणे , पान तंबाखू खाणे , दुरध्वनी व चित्रपट पाहणे व पायात पादत्राणे ( चप्पल) घालणे. हे सर्व ४० दिवस टाळावे. ४) हा महिना आपल्या हिंदूंसाठी शोकाचा , सुतकाचा , दुःखाचा आहे तरी या महिन्यात कोणतंही मंगल कार्याच नियोजन जाणिव पुर्वक टाळावे. ५ ) हे सर्वच जमत नसेल तर निदान यातलं एक तरी नियम पाळा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करा . जेणेकरून येणाऱ्या पिढीला शंभुराजांचा धर्मवीर बलिदान मास समजेल. 🙏🏻🙏🏻🚩🚩
🙏 👍 ❤️ 😢 😂 128

Comments