
Voice Of Nation...🎙️
February 3, 2025 at 12:55 PM
६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पृथ्वीराज मोहोळने टाकलेल्या डावात शिवराज राक्षे खाली पडला पण त्याची पूर्ण पाठ टेकलेली नसताना पंचांनी मोहोळला विजयी केले. त्यामुळे संतापलेल्या राक्षेने पंचाची कॉलर ओढली आणि लाथ मारली. तर पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटामध्ये मोहोळला एक गुण दिल्याने त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला, शेवटी त्याने १६ सेकंद बाकी असताना मैदान सोडले. त्यामुळे पंचांच्या निर्णयाला डावलून गोंधळ घातल्यामुळे महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांवर ३ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून घेण्यात आला आहे.
#maharashtrakesari #mahendragaikwad #shivrajrakshe #गाजावाजा #bhfyp #gajawaja
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
