
Voice Of Nation...🎙️
February 4, 2025 at 05:02 PM
*दिल्लीतून सूचना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय...!*
*दहावी बारावी परीक्षांच्या कॉपीमुक्त अभियानाचा आराखड्यात समावेश.मुख्यमंत्री फडणवीसांच्या 100 दिवसांच्या आराखड्यात समावेश,संवेदनशील परीक्षा केंद्रांवर आता ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार.*
महाराष्ट्रात बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांचे पेव फुटले होते. शासनाची कुठलीच परवानगी नसणारे हे बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी अक्षरशः विद्यार्थ्यांची पालकांची लाखोंनी फी घेऊन फसवणूक करत लूट करत होते.14-14 तास विद्यार्थी अकॅडमीत शिकून,बोगसरीत्या इतर शाळेत विद्यार्थ्यांचे ऍडमिशन केले जात होते.परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांना कॉप्या पुरून,परीक्षा आधीच विद्यार्थ्यांना पेपर देऊन, विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स पाडून दिले जात होते, ज्याने प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला उतरलेल्या विद्यार्थ्यावर अन्याय होत होता.याच भरमसाठ पडलेल्या मार्क्सच्या जीवावर,त्याची बोगस जाहिरात करून आपल्या अकॅडमीत ऍडमिशन वाढवण्याचा प्रकार केला जात होता.सदर गंभीर बाब पुराव्यासह शासनाच्या, शिक्षण विभागाच्या समोर अनेकदा तक्रारदार यांनी मांडत आंदोलन उपोषण केले, ज्याची गंभीर्याने दखल घेतली जात नव्हती परंतु 26 जानेवारी 2025 रोजी संसद भवन दिल्ली येथे उपोषणाचा निर्णय तक्रारदार यांनी घेतल्यानंतर, सदर उपोषण सोडवण्याकरिता दिल्लीतील अनेक बडे अधिकारी कामाला लागले व ठोस आश्वासन भेटल्यानंतरच तक्रारदार यांनी 26 जानेवारी 2025 रोजी चे उपोषण तात्पुरते स्थगित केले व याचाच फळ म्हणून आज मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या सूचनेनंतर 100 दिवसांच्या आराखड्यात कॉपीमुक्त अभियानाचा समावेश करावा लागला,ज्याने बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांच्या शिक्षणाच्या नावाखाली चालणाऱ्या बोगस धंद्याचं नक्कीच कंबरड मोडेल हे मात्र नक्की.
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
