
Voice Of Nation...🎙️
February 11, 2025 at 04:42 PM
*धक्कादायक*
*बारावीची परीक्षा देण्यापूर्वीच बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने संपवले आपले जीवन.*
काल रात्री म्हणजेच सोमवारी सायंकाळी परीक्षेत पेपर कसा सोडवायचा याचे लेक्चर घेऊन रात्री आठ वाजता सदर विद्यार्थी अकॅडमीतून घरी परत आला. घरी आल्यानंतर बहिणी सोबत चेष्टा मस्करी करून अभ्यास करतो म्हणून घरातील वरच्या खोलीत गेला.सगळ्यांना माहीत होतं की तो आनंदी होता, हसत खेळत होता, चेष्टा मस्करी करत होता पण रात्री नऊ वाजता त्याला घरचे जेवण करायला बोलवायला वरच्या खोलीत गेले असता,वरच्या खोलीतील दृश्य पाहता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, सदर विद्यार्थ्याने खोलीतील अँगला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. अभ्यासात अतिशय हुशार असलेला सदर विद्यार्थी स्वतःचे जीवन असे कसे काय संपवू शकतो. याचे कोडे सर्वांनाच पडले आहे.
वास्तविकता 14-14 तास अकॅडमी मध्ये रोबोट सारखे विद्यार्थ्यांना आयआयटीजेइइ,नीट,सीईटी याचेच प्रशिक्षण दिले जाते, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, कारण विद्यार्थ्यांची बोगसरीत्या ऍडमिशन इतर ठिकाणी शाळेत केलेले असतात.जिथे विद्यार्थी कधीही जात नाहीत.जेणेकरून परीक्षेत काय लिहायचं हे विद्यार्थ्यांना जमतच नाही म्हणूनच अधिक पैसे खर्च करून बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी चे मालक परीक्षा आधीच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देतात व परीक्षा दरम्यान कॉप्या पूरून त्यांना चांगल्या मार्कांनी पास करून दिले जाते.पण विद्यार्थ्यांना बघून सुद्धा कॉपी लिहायला येत नाहीत. बारावीत या बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्कस जरूर चांगले पडतात पण बारावीनंतर त्यांच्या आयुष्याचा वाटोळं होतं हे ही कटू सत्य आहे.त्यामुळे पालकांनो आता तरी जागृत व्हा. स्वतःच्या रिपोर्टेशन साठी, बघा बगीच्या नादात आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधारात घालू नका.
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
