
Voice Of Nation...🎙️
February 14, 2025 at 03:57 AM
*SSC HSC exam news 2025 दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.*
SSC HSC exam news 2025 बारावीचा राज्याचा पहिला पेपर झालेला आहे यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.राज्यातील बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत इंग्रजी विषयाचा पेपर हा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे,विद्यार्थ्यांच्या काही ठिकाणी कॉपी प्रकरण आढळले आहेत त्यामुळे आता राज्यात कॉपीमुक्त अभियान बोर्डाने राबवलेल्या असताना त्याचा फज्जा उडालेला आहे.बीड असतील त्यांन असतील या ठिकाणी कॉपी प्रकरणही बऱ्यापैकी आढळले आहे.
*सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : देवेंद्र फडणवीस*
दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी.तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा,असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी ,भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.
इयत्ता बारावीची परीक्षा कालपासून सुरु झाली असून 18 मार्च पर्यंतच्या कालावधीत 3373 परीक्षा केंद्रावर होणार आहे.दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत 5130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
कॉपीमुक्त अभियान याचा उडाला फज्जा प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान जिल्ह्यात मोठा गाजावजा करत कॉपी मुक्त अभियान राबवणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनेक ठिकाणी कॉपी करण्यात आलीय ज्यात विविध ठिकाणी 11 जणांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे.
त्याच्यात बरेच ठिकाणी अशा प्रकारची कॉपी प्रकरण आढळलेल्या आहेत प्रत्येक सीसीटी केंद्रावर आहे त्याचप्रमाणे राज्यातील परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू आहे तर भरपूर लोकांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा द्यावेत त्यांना मुक्त वातावरणात लक्ष द्यावेत अशा प्रकारे बोर्डाने आव्हान केलेले आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील कै. रेखाजी नाईक आश्रम शाळेवरील परीक्षा केंद्रावर बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला वैभव केशवराव कदम या विद्यार्थ्याने त्याच्या ऐवजी दुसरा परीक्षार्थी बसवला त्याने पेपरही दिला.याबाबत शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी त्याठिकाणी तपासणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.यानंतर ससाणे यांनी केंद्र प्रमुख यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
*पुणे,सोलापूर,सातारा जिल्ह्यातील दौंड,बारामती,इंदापूर,करमाळा,माळशिरस, वाई,मान खटाव या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठी ज्या अटी शर्ती केले आहेत ते संबंधित गटशिक्षणाधिकारी पाळत नसल्याचे समोर आले आहे. बैठे पथक स्कॉडच मॅनेज करून विद्यार्थ्यांना वर्गातच प्रश्नांची उत्तरे सांगितले जात असल्याचे समोर आले आहे.नियमानुसार सदर शाळेतील शिक्षक त्याच शाळेत सुपरविजनला जाऊ शकत नाहीत पण काही ठिकाणी त्याच शाळेतील शिक्षकांना सुपरविजन देण्यात येत आहे.सदर प्रकार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चांगलंच पाकीट भेटते अशी ही समोर आले आहे. बैठे पथक नावाला पण वर्गात शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवतात म्हणून सदर संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष पथका कडून अचानक धाड करण्यात येणार आहे .*
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub

👍
1