Voice Of Nation...🎙️
Voice Of Nation...🎙️
February 20, 2025 at 03:48 AM
*बोर्डाचा बारावीचा केमिस्ट्री चा पेपर फुटला...?* काल दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी बारामतीतील सावळच्या एका बेकायदेशीर अकॅडमीच्या होस्टेलवर,सदर अकॅडमीच्या शिक्षकांनी 20/02/2025 तारखेला होणारा बारावीचा केमिस्ट्री चा पेपर विद्यार्थ्यांना दिला असल्याच्या चर्चा संपूर्ण विद्यार्थी गटात झाल्या.सदर पेपर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी होस्टेलच्या बाहेर काल रात्री गर्दी करायला सुरुवात केली मात्र हॉस्टेलमध्ये कोणालाही आत सोडण्यात आले नाही.त्यानंतर विद्यार्थ्यांनी फोनवर व्हाट्सअप वर पेपर मिळवण्याचे सत्र सुरू केले.आता खरंच बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला का.?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.पण याही गोष्टी खरे आहेत की मागच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेचे वेळेस भिगवण,पिरळे,कटफळ,कोराळे बुद्रुक,सुपे,कळंब,पळसदेव,करमाळा येथील एक्झामिनेशन सेंटरला जाण्याआधीच बारामतीत शिकणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बसमध्येच प्रश्नांची उत्तरे सांगितली जायची.एवढेच काय तर बोर्डाचा पेपर देतो म्हणून नदी शेजारच्या एका बोगस अकॅडमी वाल्याने वर्गात विद्यार्थिनी नाचायला लावल्या होत्या आणि ही पण गोष्ट खरी आहे की अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सदर एक्झामिनेशन सेंटरवर वर्गात शिक्षकच प्रश्नांची उत्तरे सांगायची ज्यावर तक्रार केल्यानंतर बोर्डाने विशेष पथक नेमले होते व कॉफी केसही झाल्या.पण यावर्षीही सदर एक्झामिनेशन सेंटरवरच स्क्वाड मॅनेज करून विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह सांगितले जातात असेही चर्चा बाहेर येऊ लागल्या आहेत.यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी कॉपीमुक्त अभियान आपल्या शंभरच्या आराखड्यात घेतले आहे.त्यामुळे विविध ठिकाणी विशेष नियोजन पद्धतीने कॉपीमुक्त अभियान राबवली जात आहेत. सगळीकडे कडक वातावरण असूनही, अशा चर्चा जर उद्भवू लागल्या तर खरंच बोर्डाचा पेपर फुटला का? विद्यार्थ्यांना वर्गात स्क्वाड मॅनेज करून उत्तरे सांगितले जातात का? याचा तपास ही झाला पाहिजे. https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
Image from Voice Of Nation...🎙️: *बोर्डाचा बारावीचा केमिस्ट्री चा पेपर फुटला...?* काल दिनांक 19 फेब्रुव...

Comments