
Voice Of Nation...🎙️
February 22, 2025 at 01:49 PM
*कुंपणानेच शेत खाल्ले,दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?, गुन्हा दाखल*
दहावीचा मराठीच्या पेपरची प्रश्न पत्रिका फुटल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. दहावीच्या परिक्षेला लाखो विद्यार्थी वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करताना आणि यवतमाळ येथील महागाव तालुक्यात मराठीची प्रश्न पत्रिका व्हॉट्सअप वरुन व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमच्याकडे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होता.त्यानुसार आम्ही महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर निर्दीष्ठ संस्थांमध्ये गैर कायद्यांना प्रतिबंध करणारा कायदा १९८२ च्या कलम ५ आणि ६ अन्वये यवतमाळ येथील महागाव तालुक्याच्या कोठारी येथील आदर्श विद्यालयाचे केंद्र संचालक शाम तासके आणि एक मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.महागाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत असे महागाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनराज निळे यांनी सांगितले. तसेच जळगावात विद्यार्थ्यांना तीन अज्ञात युवक प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे तसेच प्रश्नपत्रिका झेरॉक्स दुकानावर वीस रुपये प्रमाणे भेटत असल्याचेही समोर आले.
*बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाताना बसमध्ये व परीक्षा केंद्रावरच म्हणजेच कटफळ,कोराळे बुद्रुक, अंजनगाव,सुपे,इंदापूर तालुक्यातील पळसदेव,कळंब,भिगवन,दौंड तालुक्यातील दौंड शहर,स्वामी चिंचोली भिगवन,माळशिरस तालुक्यातील पिराळे,करमाळा व अन्य ठिकाणी असणारे शिक्षक वर्गात जाऊन ऑब्जेक्टिव्हस चे उत्तर सांगतात,सदर तक्रारीची दखल घेत बोर्डाने सदर तहसीलदारांना सांगितले व तहसीलची टीम वरील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर गस्त घालून आहे. सदर प्रकरणात बोर्डाचे सदस्य ही सामील असल्याचे सांगितले जाते. जे सदर बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांच्या मोठमोठे सेमिनार्सला पैसे घेऊन हजेरी लावतात व ॲकॅडमीतच शिका असे आवाहन करतात. बारावी केमिस्ट्री चा पेपर बारामतीतील एका सावळ्याच्या अकॅडमीच्या होस्टेलवर फुटला आहे अशीही चर्चा उडाली होती. सदर पेपर घेण्यासाठी होस्टेल बाहेर विद्यार्थ्यांनी चांगलीच गर्दी केली होती पण सदर प्रकाराची चौकशी अद्याप झालेली नाही.*
https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub

👍
1