Voice Of Nation...🎙️
Voice Of Nation...🎙️
February 25, 2025 at 05:04 AM
*सात ते आठ वर्षात... सात ते आठ हजारावर काम करणारा झाला 420 कोटींचा मालक...!पाण्याचे मीटरचे फोटो काढता काढता,पाण टाक्या झाला भूखंडचोर... आणि केला एमआयडीसीतील सर्वात मोठा घोटाळा...!* ते म्हणतात ना चिराग घासल्यावर जिन भेटतो,पण या पाण टाक्याला एका माजी मंत्र्याला त्याच्या आवडीचा दारूचा ब्रँड पुरवल्यावर एमआयडीसीतील भूखंड भेटायला सुरुवात झाली.पोहे,ऑक्सिजन पुरवता पुरवता हा पाण टाक्या गोरगरिबांच्या हक्काचे अपंगांचे व प्रामाणिकपणे अर्ज करून उद्योग धंदा करू पाहणाऱ्यांची प्लॉट खाऊ लागला.एकाच प्लॉटच्या ऑर्डरवर एक्सपान्शन च्या नावाखाली 70-70 प्लॉट...? बारामती इंदापूर चाकण रांजणगाव इत्यादी एमआयडीसी या पाण टाक्याचे प्लॉटवर प्लॉट. २५ ते३० प्लॉटची तर मुख्यारपत्रे तयार करून घरात ठेवलेत. मंत्र्यांच्या बंगल्यांना लाजवेल असा बंगला ज्याचं मटेरियल परदेशातून.बर एक नाही तर ५-६ बंगले. बर एवढं सगळं शक्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झालं का.?एखादा नवीन ब्लॉक एमआयडीसीत पाडला रे पडला तिथं या पाण टाक्याचे लगेच दोन-तीन प्लॉट बुक होतात. कित्येक अधिकारी याच्या जीवावरच जगतात.बोगस ऑर्डर तयार करणे, त्या बोगस ऑर्डरच्या जीवावर प्लॉट देणे, एक्सपान्शन देता येत नाही तरी एकाच मालकाला पहिल्याच ऑर्डरवर एक्सपान्शन देणे, एखाद्याचा अर्ज कॅन्सल करणे, त्याच्या जागी अधिक पैसे घेऊन तिसऱ्यालाच प्लॉट देणे, ऑक्शन मध्ये प्लॉट नसतानाही तो विकणे,एकाने तर कहरच केला, जागा मागितली दुसरी पण या अधिकाऱ्यांचे जीवावर तिसऱ्याच जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायला सर्वात केली, एमआयडीसी हद्दीत एक खेळ खेळण्यासाठी असलेल्या जागेवर बोगस कंपनी दाखवली,बोगस लाईट बिल तयार केली बोगस व्यवहार दाखवले व तोच प्लॉट डॉक्टरांना विकला. बर फाईलवर साइन करायची किंवा फाईल पुढे ढकलायची तर या अधिकाऱ्यांना कमीत कमी 50 पाकीट द्यावे लागत. त्यामुळेच अधिकारी पुण्यातून बदली करून बारामतीत येतात आणि स्कुटी गिफ्ट करतात. काही अधिकारी एमआयडीसी हद्दीतच प्लॉट घेतात तर काही कंपनीला कमर्शियल कॉम्प्लेक्स ला व हॉटेलला पार्टनर होतात. हा सगळा काळाबाजार वह्या पाण टाक्याचा घोळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांन कडे तसेच केंद्रीय यंत्रणेंकडे कागदपतत्रि गेला आहे. आता काय कारवाई होईल याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. https://www.facebook.com/mohsin.pathan.14/sub
Image from Voice Of Nation...🎙️: *सात ते आठ वर्षात... सात ते आठ हजारावर काम करणारा झाला 420 कोटींचा माल...
👍 2

Comments