
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 18, 2025 at 05:54 PM
*श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+
*८५.अभंग*
भेटीलागीं माहों मन उतावीळ । कईं मी पाउले पाहिन डोळां ।।१।।
ऐसें कृष्णातीर वृक्ष औदुंबर । ऐसा जगदोद्धार देव कोठें ।।२ ।।
धन्य तेथें जन भावार्थी सज्जन । वैकुंठचि जाणा प्रत्यक्ष हें ।।३।।
स्वर्गींचे सुरवर वांछिताति जन्म | पाहाया चरणयुग्म अखंडित ।।४।।
पाहुनियां *वासू* श्रीदत्तपादुका | आल्हादुनि देखा नाचतसे ।।५।।
श्रीमद्दत्तात्रेय येथें नांदताहे । नरसिंहसरस्वती ये यतिरूपें ।।६ ।।
🙏
🙇♀️
8