
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 18, 2025 at 05:54 PM
*श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+
*८६ अभंग*
दत्तनामें पाप पळे । मग सर्व विघ्न टळे ।।१।।
मग ध्यानीं राहे मन । अनायासें होय ज्ञान ।।२।।
ज्ञानें सर्व पाप नासे । असें दुजें पावन नसे ।।३।।
स्वप्नीं नाना पापें होती । जागेपणीं तीं न वाघती ।।४।।
स्वप्नपापा प्रायश्चित्त । जागा होतां कोण घेत ।।५।।
*वासुदेव* म्हणे ज्ञाना । होतां होतो नर पावन ।।६।।
🙏
🎉
🙇♀️
8