
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 18, 2025 at 11:52 PM
*श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+
*८७ अभंग*
चंदनाचे बनीं अन्यवृक्ष बसे ।
चंदन होतसे शीत सुगंध ।।१।।
चंदनाचे परी तोही ताप वारी ।
शीतलता करी बरी सर्वा ।।२।।
दैवें संतांचिया जवळी राहती ।
तेही संत होती गती दाते ।।३।।
कर्म उपासना सांगूनि तें ज्ञान ।
उद्धरती दीनजनांते ही ।।४।।
ते त्रिविध पाप वारिति त्रिताप ।
तेचि दत्तरूप *वासु* म्हणे ।।५।।
🙏
❤️
🙇♀️
9