Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 19, 2025 at 05:46 PM
*"श्री गजानन विजय" ग्रंथांच्या १९व्या अध्यायात, श्री गजानन महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या भेटीचे आलेले वर्णन....*
श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।
कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥ ६८॥
ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।
बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥
अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।
मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥
तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।
चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥
चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।
जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥ ।
तो कऱ्हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।
हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥
ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।
तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥
एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।
हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥
एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।
एक मोगरा सुंदर। एक तरु गुलाबाचा ॥७६॥
एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।
एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७ ॥
स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।
आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥ ७८॥
स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।
तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥
फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।
स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥
🙏
❤️
💐
😂
🙇♀️
21