
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 20, 2025 at 12:38 AM
*श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+
*८८.अभंग*
सेवावे संत जन । वंदावे लीन होऊन।।१ ।।
उदार संत मुक्त । करिती ते कर्मबधित ।।२ ।।
पुण्य पाप जें संतांचें । हिशेदार असती त्याचे ।।३।।
संतांच्या सुकृता घेती जे भावें त्यां सेविती ।।४।।
संतांच्या पापा घेती । जे दुष्ट त्यां द्विषिती।।५।।
*वासुदेव* म्हणे संतां । दत्त मानी आत्मवत् ।।६।।
🙏
❤️
🙇♀️
11