Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
February 20, 2025 at 02:41 AM
श्रीदत्तस्वरुप विनायकराव वासुदेव साठे विरचित "स्थान जयासाठीं प्रार्थना " तुझिये स्थानाचा व्हावा जयजयकार । तुवां साक्षात्कार करणें येथें II१II कोणा अभिमान तुझिया स्थानाचा । तुझाच हा साचा योग सारा II२II आम्हांलागी नाथ तुवां अंगिकारिलें । आम्हां जवळी केलें तुवां बारे II३II तुझिया आज्ञेनें भजनपूजन । केलें आम्ही सेवन तुझ्या इच्छें II४II विश्वास धरिला तुझ्या स्थानावरी । नाथ आजवरी जाणतसां II५II देह कष्टविला कामना सांडिली । सांडिव सर्व केली संसाराची II६II तरी तुजलाचि आम्हीं हो गार्ईलें । तुज जवळी केलें हृदयांत II७II तरी आतां कृपा प्रभूजी करावी । अनुभवा यावी तुझी दया II८II विनायक ठेवी चरणांवरी शिर । तरी अत्रिकुमार अंगिकारी II९II
Image from Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914): श्रीदत्तस्वरुप विनायकराव वासुदेव साठे विरचित "स्थान जयासाठीं प्रार्थना...
🙏 ❤️ 😂 🙇‍♀️ 15

Comments