Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 22, 2025 at 02:05 AM
                               
                            
                        
                            *श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी आणि समर्थ रामदास स्वामी स्नेहसंबंध*
श्रीमद टेम्बेस्वामी महाराजांनी दासबोधावरील प्रवचनातून प्राकृत भाषेचे महत्व सांगितले .
ऊजैनचा पहिला चातुर्मास झाल्यावर श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ऊज्जैन वरून  मुक्काम   जालवणला झाला.जालवण हे विद्वानांचे गाव होते. लोकांच्या आग्रहास्तव श्रीस्वामीमहाराजांना आपला येथील मुक्काम वाढवावा लागला.येथेही श्रीस्वामीमहाराजांचे नित्याप्रमाणे लोकांना शास्त्रे व उपनिषदे सांगण्याचे काम चालू होते.रात्री पुराण होत असे. याच मुक्कामात दासनवमीचा उत्सव झाला.
*श्रीस्वामीमहाराजांचे दंडगुरु श्रीनारायणानंदसरस्वती स्वामी महाराज हे रामदासपंथी होते म्हणून श्रीस्वामीमहाराज दासनवमीचा उत्सव साजरा करीत व दासबोधावर प्रवचन करीत असत.*
यावेळी सुध्दा दासबोधावर प्रवचन होणार असे कळताच गावातील एका श्री.शास्रीबुवांना ही गोष्ट पसंत पडली नाही.श्रीस्वामीमहाराजांची विद्वत्ता व त्यांचे संस्कृत भाषेतील प्रभुत्व सर्वांना माहित होते आणि ते श्री.शास्रीबुवाही संस्कृत भाषेचे अत्यंत अभिमानी होते.त्यामुळे त्यांना असे वाटत होते की," दासबोध हा प्राकृत ग्रंथ आहे.तो सर्वसामान्यजनांसाठी असून ज्यांना संस्कृतचा गंधही नाही, त्यांनी फार तर त्याचे वाचन करावे." त्यांनी जेव्हा आपले हे मत श्रीस्वामीमहाराजांजवळ बोलुन दाखविले तेव्हा ते काही बोलले नाहीत, परंतु त्यादिवशी रात्री दासबोधातील ७ व्या दशकातील दुसरा समास वाचता त्यांनी" यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह।आनन्दं ब्रह्मणो विद्वान न बिभेति कुतश्चनेति ।।" या तैत्तिरीयोपनिषदातील श्रुतीचा अर्थ सांगून " जेथे वाचा निवर्तति। मनासी नाही  ब्रह्मप्राप्ती। ऐसी बोलिली श्रुती। सिद्धांतवचन।। " ही दासबोधातील ओवी वाचून दाखवून त्यांनी वरील श्रुतीवचनाच्या व दासबोधातील ओवीच्या एकरूपतेचे मोठ्या अपूर्वतेने विवेचन केले.
     पुराण संपल्यावर श्रीस्वामीमहाराजांनी त्या श्री.शास्रीबुवांना असे विचारले की," काय शास्रीबुवा! दासबोध ग्रंथ प्राकृत आहे की संस्कृत आहे ते आपण आता नीट विचार करून सांगा." हे ऐकताच श्री.शास्रीबुवांना श्रीस्वामीमहाराजांचे म्हणणे मनाला फार लागले व आपली चुक त्यांना पटली.त्यामुळे त्यांनी लगेच श्रीस्वामीमहाराजांची क्षमा मागितली.श्रीशास्रीबुवांची अशा प्रकारची चुक कबुल करण्याची उदारवृत्ती पाहून त्यांना फार समाधान वाटले व त्यांना यासंबंधी समजावून सांगताना ते असे म्हणाले की," ग्रंथ वाचीत असताना तो प्राकृत आहे की संस्कृत आहे, या बाह्यांगाचा विचार करू नये.कारण विषयप्रतिपादनाच्या दृष्टीने त्याचे महत्व गौण आहे. जे सत्य श्रुतीने सांगितले आहे तेच सत्य सामान्यांच्या प्राकृत भाषेत संतांनी सांगितले आहे.
      
श्रीगुरुदेव दत्त
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            🎉
                                        
                                    
                                        
                                            🙇♀️
                                        
                                    
                                    
                                        9