
*Rajyoga Phad Ji Seva Channel*
February 22, 2025 at 03:10 AM
*हार्ट अटॅकच्या 1 महिना आधी दिसतात ही लक्षणे*
आजकाल सर्वांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काही कामात व्यस्त असतो. पण यात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि कळत नकळत आपल्या शरीरावर याचा परिणाम होत असतो.
सध्या हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिना आधी माणसाला काय लक्षणे जाणवतात? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ही लक्षणे माहिती असल्यास तुम्हाला हार्ट अटॅक ओळखणे सोपे जाईल.
लक्षणांकडे दुर्लक्ष करता?
यातही सायलेंट हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असू शकतो. ते ओळखणे फार कठीण होऊन बसते. बऱ्याच वेळा लोक सायलेंट हृदयविकाराच्या झटक्याच्या हल्ल्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. छातीत हलके दुखणे किंवा अचानक श्वास लागणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते आणि दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला माहित आहे का हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच शरीरात दिसून येतात. ही लक्षणे कोणती आहेत? हार्ट अटॅक आल्यावर कोणतीा काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या.
जर्नल सर्कुलेशनमध्ये काय म्हटलंय?
जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच दिसू लागतात. या तपासणी प्रक्रियेत 500 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.यापैकी 95 टक्के महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या महिन्याभरापूर्वी शरीरात काही बदल जाणवू लागले होते. हे बदल हार्ट अटॅकची लक्षणे होती. 71 टक्के महिलांना जास्त थकवा येत होता. तर 48 टक्के महिलांना झोपेशी निगडीत समस्या जाणवत होती. तर अन्य स्त्रियांना छाती दुखणं, छातीवर दाब येणे, वेदना ही लक्षणे जाणवत होती.
एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत
हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा जाणवणे, सतत चिंता सतावणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा किंवा हात सुन्न होणे, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, भूक न लागणे, हात पायांना मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे या सर्वगोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
अशी घ्या काळजी
हार्ट अटॅकमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे? असा प्रश्न आपल्याला पडतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी आहाराचे लक्ष्य ठेवणे. सध्याच्या धकाधकीच्या काळात निरोगी आहाराकडे लक्ष राहत नाही. आणि हेच हार्ट अटॅकचे कारण ठरू शकते. याशिवाय धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर वेळीच ही सवय सोडून द्या. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप हे देखील तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
*देवियों और सज्जनो राजयोग सेवा च्या खाली कोणताही एकच ग्रुप मध्ये सामील व्हा सर्व पोस्ट सारख्याच असतात*
👉 आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.
नियमित डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळीच घ्या. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं घेणं बंद करू नका अन्यथा समस्या वाढू शकतात.
*चांगली झोप कशी घ्यावी*
👉 रात्री झोपण्यापूर्वी खूप जड अन्न खाऊ नका, रात्री फक्त हलके अन्न खा. ✔️
👉रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहू नका. 🚫
👉रात्री कॅफिनचे सेवन टाळा, कॅफिनमुळे झोपेचाही त्रास होतो.
झोपण्यापूर्वी खोलीचे दिवे मंद ठेवा आणि हलके संगीत ऐका. 🎼
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
*Sir If you can't read this post in Marathi then translate it to your language English Urdu Telugu Tamil Kannada and All other languages*Thanks🤝 ji.
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
1) राजयोग प्रसारण ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/Gts330pn7lQ4F09azlImaX
2)राजयोग साधना ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/8cUNMBwR1QU52zMtAh8GcO
3)राजयोग प्रणयाम ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/GLAcoEdDNUTJ1qkSqmGEXx
4)राजयोग सुर्यनमस्कार ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/JGfNJ0VNVun1k4ThNWB6NY
5)राजयोग योग ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/GqLSCRrCZF084rXy7MbPBO
6) राजयोग समाजभुषण फड जि सेवा ग्रुप
https://chat.whatsapp.com/BtvUXgZ9lkxKqthQkM88Bw
7) राजयोग राज्य स्तरीय समाजभुषण फड जि सेवा ग्रुप
https://chat.whatsapp.com/6DFxihYatKv8Xh1IjoIO3M
8} युट्युब चॅनल वर व्हिडिओ
https://www.youtube.com/@jijaramrphad
9) फेसबुक नक्की लॉगिन करा
👉https://www.facebook.com/share/v/14tUo9zmXQ/?mibextid=oFDknk
👉
https://www.facebook.com/jijaramr.phad?mibextid=ZbWKwL
🎖️महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय *समाजभूषण* 2023 व महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित राजयोग सेवा फड जी ग्रुप🏅
आपल्या आरोग्यासाठी स्वतः व मीत्र नातलग इतरांनाही लिंक पाठवून कींवा त्यांनच्या ग्रुपमध्ये *०९४२२७९२०४३* हा नंबर समाविष्ट करुण सामील व्हा 🙏
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
🎙️सर आप पोस्ट को मराठी मे नही पड सकते तो अपनी भाषा मे ट्रान्सलेट कर ले🌹