Office of Sanjay Rathod
Office of Sanjay Rathod
February 19, 2025 at 05:18 AM
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगप्रवर्तक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी महाराजांना वंदन केले व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकार तर्फे आयोजित "जय शिवाजी, जय भारत" पदयात्रेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली, तसेच यात ते सहभागी झाले. मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झालेल्या या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता, जिजाऊ तसेच मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले बाळ - गोपाळ यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते, या सर्वांशी त्यांनी संवाद साधला तसेच त्यांचे कौतुक केले.

Comments