
Office of Sanjay Rathod
February 24, 2025 at 04:54 PM
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती।
नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु।।
आज उत्तर प्रदेश राज्यातील #प्रयागराज येथील गंगा- यमुना-सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर आयोजित महाकुंभमेळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते सन्माननीय मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी उपस्थित राहून त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचा अलौकिक आनंद घेतला.
यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले, उदय सामंत तसेच मीरा भाईंदरचे विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह हे देखील उपस्थित होते.