
Office of Sanjay Rathod
February 28, 2025 at 01:34 PM
जय सेवालाल...
दिल्ली येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८६ व्या जयंतीनिमित्त तसेच श्री रूपसिंह जी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य बंजारा महोत्सवाला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी उपस्थित राहून देशभरातून आलेल्या समाज बांधवांशी संवाद साधला.
गेल्या सहा वर्षांपासून संत सेवालाल महाराज ˈचॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने देशभरातील समाज बांधवांसोबतच समाजाचे संत- महंत, राजकीय, सामाजिक, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य, संशोधन, प्रशासन, उद्योग यासह विविध क्षेत्रात कार्य करणारे नामवंत मान्यवर देखील या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांच्या चर्चेतून समाजाला दिशा आणि प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी ते म्हणाले.
संत सेवालाल महाराज ˈचॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उमेश जाधव जी हे दरवर्षी या महोत्सवाच्या आयोजनासाठी मोठी भूमिका बजावत असतात यावेळी त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
आजच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्ला जी, पोहरादेवी शक्ती पिठाचे धर्मगुरू मा. बाबुसिंह महाराज जी, महंत मा. शेखर महाराज जी, सोबतच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदास आठवले जी, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकर पवार, चिंचोली विधानसभा (कर्नाटक) आमदार डॉ. अविनाश जाधव, प्रसिद्ध गायिका मा.अमृता फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.