Office of Sanjay Rathod
Office of Sanjay Rathod
March 1, 2025 at 10:54 AM
उमरखेड तालुक्यातील पळशी येथे बांधण्यात आलेल्या पुल कम बंधाऱ्यांची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांनी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांसोबत पाहणी केली. या बंधाऱ्यामुळे आसपासच्या बहुतांश शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे, तसेच सिंचन क्षेत्र वाढण्यास देखील मदत होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी हदगाव - हिमायत नगर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कालिंदाताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, पराग पिंगळे, उमरखेड तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिरासे, उमरखेड तालुका प्रमुख संतोष जाधव, उमरखेड शहर प्रमुख ॲड. संजय जाधव, यवतमाळ - वाशिम लोकसभा अध्यक्ष ॲड. विशाल गणात्रा तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments