Shekhar Jamin Niti
Shekhar Jamin Niti
February 26, 2025 at 01:34 PM
लग्नासाठी कोणी पोरगी देईना म्हणून माझ्या एका मित्राने वाकडमध्ये १ कोटींचा फ्लॅट विकत घेतला.त्यासाठी ४० लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित ६० लाख रुपयांचं कर्ज काढलं. त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फ्लॅट भाड्याने दिला. त्याला आता महिन्याकाठी ३० हजारांपेक्षाही कमी भाडं येतं तरिही आपण ३० हजार पकडुया. वाकडच्या ज्या पॉश बिल्डींगमध्ये त्याने फ्लॅट घेतला तिथे वर्षाला तो मेंटेनंस देतो १ लाखांचं. ६० लाखांच्या कर्जावर ९ टक्क्याने त्याला व्याज लागतंय. आणि EMI येतोय ३८ हजार. तसच प्रॉपर्टी टॅक्स वेगळा. त्याचबरोबर भाड्यावर इन्कम टॅक्स लागतो तो वेगळाच. वर्षाकाठी भाड्याचे ३ लाख ६० हजार येतात त्यापैकी मेंटेनन्स ची रक्कम वजा करून याला उरतात फक्त २ लाख २० हजार ते २ लाख ५० हजार. म्हणजे वर्षाला रेंटल यिल्ड झाला २.२% ते २.५ टक्के त्याला बिचाऱ्याला अजूनही वाटतं ही गुंतवणूक आहे😅 या घराच्या रकमेतले त्याच्याकडचे ४० लाख जरी त्याने कमीतकमी १० टक्क्यांनी गुंतवले असते तर त्याला महिन्याकाठी 33 हजार आरामात मिळाले असते. (त्यावरचा compunding effect वेगळा) यात पुण्यात जरी तो आला तर 26 हजार तश्याच फ्लॅटमध्ये भाडं भरुन राहु शकला असता आणि वरच्या 7 हजारातून खर्च भागवू शकला असता. तसच कर्जावरचं व्याज वाचलं असतं ते वेगळं. इन्व्हेस्टमेंट म्हणून overhyped किमतीत फ्लॅट घेणं, आणि मग स्वतःच घर म्हणून भावनिक होणं आणि नंतर मी घेतलेल्या फ्लॅट ची किंमत 10 वर्षांनी कशी वाढणार याच्या फ्लॅट न विकता फक्त गप्पा आणि calculations करणं याला काहीही अर्थ नाही. जिथे पैसे आणि वेळ आपण गुंतवतो ते निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यायला पाह्यजे. आपला प्रवास आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याकडे असला पाहिजे, आणखी liabilities वाढवण्याकडे नाही. त्यामुळे विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींनाही माझी विनंती आहे की लग्न करताना मुलाकडे फ्लॅट असावा ही अट ठेवणं तुमच्याच भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे. - सौरभ कोरटकर
👍 😮 10

Comments