ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 10, 2025 at 02:47 AM
दानशूर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि मुंबईला आधुनिक महारथी बनविणारे व मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! नाना शंकरशेट यांनी शिक्षण, समाज सुधारणा आणि सार्वजनिक कल्याणासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या दूरदृष्टीने अनेक शिक्षणसंस्था उभारल्या गेल्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण झाले. मुंबईत रेल्वे सुरू करण्याची पहिल्यांदा संकल्पना त्यांनीच जमशेटजी जिजिभोय यांच्याकडे मांडली. या दोघांनी मिळून 1845 साली 'इंडियन रेल्वे असोसिएशन'ची स्थापना केली. त्याचाच परिपाक म्हणजे, 1 ऑगस्ट 1849 रोजी 'द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे' (GIP रेल्वे) ची स्थापना झाली. व पुढे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे हा 32 किलोमीटरचा प्रवास या रेल्वेनं 57 मिनिटांत पूर्ण केला. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षणसंस्थेचे संस्थापक नाना शंकरशेट आहेत. त्यांच्याच पुढाकाराने 1822 साली मुंबईची हैंदशाळा आणि स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली. याच संस्थेचे पुढे 1824 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रुपांतर झाले. उच्च शिक्षणासाठी 'एलफिन्स्टन फंड' गोळा केला गेला, त्याचे विश्वस्त नाना शंकरशेट होते. याच निधीतून 1827 साली पुढे एलिन्स्टन हायस्कूल आणि कॉलेज सुरु करण्यात आलं. 1841 साली ते बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या मंडळावर गेले. 1845 साली नानांच्या सहकार्यानं ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. मुलींसाठी शाळा, विधी महाविद्यालयाचा पाया, ॲग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया आणि जिऑग्राफिकल सोसायटी या संस्थांचं प्रमुख, अध्यक्षपद, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेत सहाकर्य, मुंबई विद्यापीठ... शिक्षण आणि संस्थांत्मक कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. 1823 साली ब्रिटिश पार्लमेंटकडे सती या अमानुष प्रथेवर बंदी आणण्यासाठी अर्ज केला गेला. त्यावर राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांच्या प्रामुख्यानं सह्या होत्या. पुढे 1829 साली सती चालीस बंदी घालणारा कायदा आणला गेला, त्यावेळी नाना शंकरशेट यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला. 1861 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात नानांना स्थान मिळालं. 1862 साली ते तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागर म्हणूनही नियुक्त झाले. बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करण्यात नाना शंकरशेट यांनी योगदान दिलंय. याच कायद्यान्वये मुंबई महापालिकेची स्थापना झाली. माहितीचा स्रोत: बीबीसी न्युज #nanashankarsheth #educationforall #socialreformer #mordenmumbai #mumbai #obcadhikarikarmacharisangh *'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
👍 2

Comments