
🔱HINDU 🪷🚩🚩🚩 🚩🚩🚩 जय हिंद,जय भारत,जय जोहार 🔱,जय महाराष्ट्र।-🙏 लोहासारवा 🙏
February 20, 2025 at 04:50 PM
रायपूर : *ब्राह्मण मुली २० लाख.......,*
*दलित १० लाख.....*,
*असे धर्मांतरण रेटकार्ड बनवून हिंदू मुलींचा सौदा करणाऱ्या कट्टरपंथी गँगचा बुरखा फाडण्यात पोलिसांना यश आले आहे. राजस्थानातील अजमेरच्या विजयनगर पोलीस ठाणे परिसरात, शाळेत जाणाऱ्या मुलींना फसवून त्यांचे शोषण आणि धर्मांतर केले जात आहे.धर्मांतरण रेटकार्ड तयार करत लक्ष्य केल्याचे आरोप पीडितांनी केले आहेत.आरोपीने दिलेल्या जबाबात म्हटले की, त्याने विद्यार्थींनींना मोबाईल फोन दिले. त्यानंतर त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. या फसवणूक प्रकरणामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.*
यावेळी धर्मांतरण रेटकार्ड तयार केल्याचा आरोप असणाऱ्या रिहान मोहम्मद वय वर्षे २०, सोहेल अन्सारी वय वर्षे १९, लुकमान २० वर्षे, अरमान पठाण वय वर्षे १९, साहिल कुरेशी १९ वर्षे, हिंदू युवतींचे लैंगिक शोषण करणारे दोन अल्पवयीन युवक अशिक्षित आहेत. त्यापैकी कोणीही शिक्षण घेतले नाही. त्यापैकी काहीजण हे वेल्डिंगचे काम करत होते. तर काहीजण फर्निचरचे काम करत होते. त्यांचे लक्ष्य इयत्ता दहावीच्या हिंदू विद्यार्थिनी होत्या. या मुली जवळच्या परिसरामध्ये वास्तव्य करत होत्या आणि कट्टरपंथी युवकांच्या मोहल्ल्यातून शाळेत जात होत्या. याचाच फायदा घेत आरोपींनी डाव साधला.
यावेळी एका पीडितेने सांगितले की, सोहेल मन्सूरी नावाच्या कट्टरपंथीने गेली १५ दिवसांपासून तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. सोहेलने त्यांच्यासमोर नंबर लिहिण्यात आलेल्या चिठ्ठ्या फेकल्या. युवतीने त्याला फोन केला. आरोपीने पीडितेला एका कॅफेमध्ये बोलावले. मात्र, त्यावेळी तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. या सर्व घटनेचे फोटोही काढण्यात आले. या प्रकरणामध्ये सोहेलसोबत इतर आरोपींचा सहभाग होता. यावेळी पीडितेने सांगितले की, सोहेल हा त्याच्या मित्रांसोबत बोलण्यास जबरदस्ती करत होता.
अधिक वृत्तानुसार, पीडितेने सांगितले की, तिला मोबाईल फोन देण्यात आला. ज्याद्वारे पीडितेला सोहेल सतत धमकावत होता. पीडितेला सोहेलने आपल्या मित्रांना रायन, जावेद आणि अरमानशी बोलण्यास सांगितले होते. त्यानंतर रोजा कसा असावा याबाबत ब्रेनवॉशही करण्यात आले. पीडितेच्या हातावरही जखमा झाल्या आहेत. पीडित मुलींवर कलमा म्हणण्यासाठी दबाव आणला गेला होता.
याचपार्श्वभूमीवर धर्मांतराच्या तयारीसाठी, त्यांना नवीन गाड्य़ाही दाखवण्यात आल्या होत्या. युवतींना घेऊन जाण्यासाठी, हे कट्टरपंथी कधी विविध वाहने आणत आणि छेडत असत. यावरून एका पीडितेने सांगितले की, ते म्हणाले की, जर आम्ही ब्राह्मण युवतीला प्रेमाच्या जाळ्यात पकडत लव्ह जिहाद केल्यास त्यांना २० लाख रुपये मिळतील. तर वंचित युवतीसोबत लव्ह जिहाद केल्यास आम्ही १० लाख रुपये मिळतील. धर्मांतरण रेटकार्ड देऊन मुलींना फसवण्यासाठी अधिकाधिक तरुणांना प्रवृत्त केले जात होते. पीडित हिंदू मुलींच्या अश्लिल फोटो आणि व्हिडिओचा धाक दाखवून त्यांना सतत धमकावले जात होते.
कुटुंबियांनाही केली शिवीगाळ!
या प्रकरणाची माहिती एका युवतीच्या माध्यमातून समोर आली. युवतीच्या कुटुंबाने तिचा मोबाईल फोन घेतला आणि एका आरोपीला फोन केला. "मी त्याला फोन केला तेव्हा त्याने मला शिवीगाळ देत धमक्याही दिल्या, असे पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितले. यामुळे एक नाहीतर अनेक युवती या प्रकरणाच्या बळी पडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपींना न्यायालयीन कोठडी!
या प्रकरणी आता पोलिसांनी जबाब नोंदवला असून आरोपीला बेवार येथील न्यायालयामध्ये दि: १९ फेब्रुवारी रोजी हजर केले. न्यायालयाने आरोपींना कोठडी सुनावली आहे. यावेळी पीडितांनी आपला जबाब नोंदवला. अटक आरोपींपैकी दोघेजण अल्पवयीन आहेत.