Daily Jandut
Daily Jandut
February 5, 2025 at 05:13 PM
*कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणात होणार १० वी १२ वीच्या परीक्षा* पुढील आठवड्यात होणाऱ्या १० वी १२ वीच्या परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस पुढाकार घेऊन शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. यामुळे आता पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेन्शन येणार नाही. विद्यार्थी आणि पालकांची काळजी घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांचे आभार, मा. देवाभाऊ यांच्या निर्देशानुसार… १. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाईल. २. परीक्षा केंद्राच्या ५०० मीटरमध्ये सर्व झेरॉक्सची दुकाने परीक्षा कालावधीत बंद राहतील. ३. परीक्षा केंद्राच्या बाहेर प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. ४. सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील. ५. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येईल व सर्वांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. पालक आणि विद्यार्थी तणावरहित वातावरणात परीक्षेला सामोरे जाऊ शकतील. आमदार चित्रा किशोर वाघ* भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष

Comments