
South Mumbai News
February 12, 2025 at 03:59 PM
शाळाप्रवेशात फसवाफसवी !
आवडत्या शाळेच्या नादात पालक बनावट एजंटच्या जाळ्यात
चालू शैक्षणिक वर्ष जवळपास संपत येत असून नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली आहे. आवडत्या शाळांमध्ये शिशुवर्गापासून प्राथमिक, माध्यमिक इयत्तांमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र चांगल्या शाळेत प्रवेश मिळविण्याच्या नादात पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समोर येत आहेत. बोरिवलीमध्ये तीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना फसविण्यात आल्याचे उघड झाले आहे.
खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेला नुकताच याचा फटका बसला. ऑगस्ट २०२४मध्ये तिची ओळख करिष्मा मेहता नावाच्या महिलेसोबत झाली. मुलीची शिकवणी घेणाऱ्या करिष्माने ती 'शिखा अकॅडमी स्कूल'ची फ्री लान्सर एजंट असल्याचे सांगितले. चांगल्या शाळेमध्ये ओळख असल्याने या शिक्षिकेने करिष्माला या शाळेत नोकरीचे, तसेच मुलाला प्रवेश मिळेल का, याबाबत विचारले. त्यावर करिष्मानेही मुलाचा प्रवेश सहज होईल, असे आश्वासन दिले. मुलाची आणि शिक्षिकेची कागदपत्रे घेऊन आणि वेगवेगळी कारणे सांगून तिने सुमारे सव्वा लाख रुपये घेतले