South Mumbai News
South Mumbai News
February 12, 2025 at 03:59 PM
रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनचा गुंता कायम रिक्षा व टॅक्सीची दरवाढ होऊन अकरा दिवस उलटले तरी मीटर रिकॅलिब्रेशनचा गुंता सुटलेला नाही. भाडेवाढीबाबत संभ्रमाचे वातावरण कायम राहून रिक्षा-टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. मीटर रिकॅलिब्रेशन प्रक्रियेतील विलंबामुळे चालकांना प्रवाशांकडून नवीन दराने भाडे घेणे मुश्कील बनले आहे. याचदरम्यान मीटर रिपेअरिंग असोसिएशनने योग्य मोबदला मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून कॅलिब्रेशनचे काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. परिवहन विभागाचे धोरण अन्यायकारक परिवहन विभाग आणि मीटर उत्पादक आमच्यावर कमी पैशांमध्ये काम करण्यासाठी दबाव टाकत आहे. आम्ही मीटर कॅलिब्रेशनसाठी ७०० ऐवजी ८०० रुपयांची मागणी केली आहे. मीटर टेस्टिंग लॅबच्या कमतरतेमुळे आम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून कारवाईचा बडगा उगारणे अन्यायकारक आहे. परिवहन विभागाच्या याच धोरणाला विरोध म्हणून आम्ही मीटर कॅलिब्रेशनचे काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे, असे मीटर रिपेअरिंग असोसिएशनचे सेक्रेटरी अरुण कळंबे यांनी सांगितले

Comments