South Mumbai News
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 12, 2025 at 03:59 PM
                               
                            
                        
                            रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणानंतर खोदकामाला परवानगी नाही
पालिका आयुक्तांचे अभियंत्यांना स्पष्ट निर्देश
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. याबाबत विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांना अवगत करण्यात आले आहे. एकदा काँक्रिटीकरणाची कामे झाली को, कोणत्याही संस्थेला खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अभियंत्यांना दिले आहेत