
South Mumbai News
February 17, 2025 at 10:29 AM
जूनपासून स्कूल बस भाडे १८ टक्क्यांनी वाढणार ?
नवीन शैक्षणिक वर्षात स्कूल बस फी वाढीचा जोरदार झटका पालकांना बसण्याचे संकेत आहेत. अर्थात, विद्यार्थी सुरक्षा नियमावलीच्या अनुषंगाने बसमध्ये दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सुविधा, तसेच बसची देखभाल, दुरुस्ती आणि इंधन व मनुष्यबळाच्या वाढत्या खर्चामुळे ही भाडेवाढ अटळ असल्याचे स्कूल बस संघटनांचे मत आहे. मात्र, त्यांनी प्रस्तावित केलेली भाडेवाढ तब्बल १८ टक्क्यांच्या घरात आहे. त्यातदेखील ही अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केल्यानंतर खरंच 'विद्यार्थी सुरक्षेचे ध्येय साध्य होणार का? हा प्रश्नही पालकांना सतावतो आहे
मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाने जानेवारी ते डिसेंबर २०२४ दरम्यान ७३९ गाड्यांची तपासणी केली आहे